मुंबई : कोरोनाची पार्श्वभुमी आणि तिस-या लाटेची शक्यता गृहीत धरत मुंबई येथे होणा-या पावसाळी अधिवेशनासाठी 5 व 6 जुलै हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विधानभवनात अधिवेशन कालावधीत येणा-या सर्व संबंधीतांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असावे. याशिवाय विधानभवन परिसरात प्रवेशासाठी सर्वांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी आवश्यक करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक आदींची बैठक व्यवस्था बाहेरच्या तंबूत केली जाणार आहे. मंत्र्यांसह राज्यमंत्र्यांसोबत केवळ एकच अधिका-याला प्रवेश मिळणार आहे.