सिने अभिनेत्री शबाना आझमींची मद्य खरेदीत फसवणूक

On: June 24, 2021 6:32 PM

मुंबई : सिने अभिनेत्री शबाना आझमी यांनी ऑनलाईन पेमेंट करुन मद्य मागवले असता त्यांची फसवणूक झाली आहे. सध्या ऑनलाईन खरेदीवर कित्येक जण भर देत आहेत. घराबाहेर पडण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन वस्तू मिळत असल्याने अनेकांना ते सोयीचे वाटते. मात्र ऑनलाईन मद्य खरेदीत सिने अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक झाली आहे.

शबाना आझमी यांनी केलेल्या ट्वीटनुसार त्यांनी ‘लिव्हिंग लिक्विड’ या ऑनलाईन मद्य विक्री करणाऱ्या वेबसाईटवरुन ऑनलाईन मद्याची ऑर्डर दिली. त्या ऑर्डरचे बिल देखील आझमी यांनी ऑनलाईन जमा केले. मात्र ऑनलाईन पैसे जमा करुन देखील मद्य त्यांच्यापर्यंत आलेच नाही. याबाबत ‘लिव्हिंग लिक्विड’ सोबत संपर्क साधण्याचा शबाना आझमी यांनी प्रयत्न केला. मात्र पलीकडून फोन उचलणे बंद झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment