अभिनेत्री मिमी चक्रवर्तींची बनावट लसीकरणाने बिघडली प्रकृती

On: June 26, 2021 5:58 PM

कोलकाता : बनावट कोरोना लस घेतल्यामुळे अभिनेत्री तथा पश्चिम बंगालच्या खासदार मिमी चक्रवर्ती आजारी पडल्या आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी बनावट लसीकरण केंद्रावरुन लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेतल्यानंतर चार दिवसांनी आजारी पडण्याचा प्रकार समोर आला आहे.

काही दिवसांपुर्वी एका लसीकरण शिबिरासाठी मिमी चक्रवर्ती यांना आमंत्रीत करण्यात आले होते. सदर लसीकरण शिबीर कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जॉईंट कमिश्नर यांच्या वतीने ट्रान्सजेंडर व अपंगांसाठी मोफत असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी मिमी चक्रवर्ती यांनी लसीचा डोस घेतला. मात्र त्यांना मोबाईलवर कोणताही संदेश आला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. शंका आल्यामुळे त्यांनी लसीकरण स्थगीत करण्यास सांगितले. त्यांनी लागलीच पोलिसांना पाचारण केले. आयएएस अधिकारी असल्याचे सांगून कार्यक्रमाला बोलावणा-या देबांग देव या आयोजकाला ताब्यात घेतले असून तो सध्या पोलिस कस्टडीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment