जनमत प्रतिष्ठानच्या वतीने कोविड तपासणी शिबीर

On: June 27, 2021 10:17 PM

जळगाव : जनमत प्रतिष्ठान व भक्तवत्सल श्रीराम नगर तरुण मित्र मंडळ दादावाडी यांच्या सहकार्याने विनामूल्य कोविड -19 तपासणी शिबिर नुकतेच उत्साहात झाले. दादावाडी परिसरातील प्रभाग 8 मध्ये विनामूल्य कोविड 19 तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सुरुवातीला जि.प. व कृउबा समितीचे माजी सभापती स्व. बळीराम सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालय व शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्ष समाजसेविका सरिता कोल्हे यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, ऑल इंडिया शाहू ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन सैंदाणे, कुंदन सुर्यवंशी, नगरसेवक चंद्रशेखर पाटील, वासुदेव पाटील, हर्षाली पाटील, ललित धांडे, महेश राठी, विजय लुल्हे, इंडियन रेडक्रॉसचे दिनेश तेजी, योगेश सपकाळे आदी यावेळी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment