भोगवटा 2 च्या मिळकतीबाबत प्रक्रिया वर्षभर चालणार

On: July 5, 2021 7:06 PM

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा – भडगाव तालुक्यातील भोगवटा वर्ग 2 च्या मिळकती वर्ग 1 मध्ये करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी वर्षभर करण्यात येणार असल्याची ग्वाही प्रांताधिका-यांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिली आहे.

शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे की भोगवटा वर्ग 2 चा वर्ग 1 मध्ये करणे आणि सत्ता “ब” प्रकारच्या मिळकती बाबतचा तिन दिवसाचा कॅंम्प पाचोरा उपविभागीय कार्यालयात लावण्यात आला होता. मात्र मिळकत धारकांची कागदपत्रांची जमवाजमव करण्यात दमछाक झाली होती. त्यामुळे त्याची मुदत वाढवून देण्याची मागणी कॉंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आज पाचोरा प्रांताधिका-यांना निवेदनाच्या माध्यमातून सदर मागणी करण्यात आली.

सदर प्रक्रिया वर्षभर सुरु राहणार असल्याचे आश्वासन प्रातांधिका-यांनी यावेळी दिले. यावेळी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमजद पठाण, जिल्हा अल्पसंख्यांक सचिव इरफान मनियार, महीला जिल्हा सचिव कुसुम पाटील, उपाध्यक्षा संगिता नेवे, तालुका अध्यक्षा अ‍ॅड. कविता पवार, कल्पना निंबाळकर, रेखा पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शरीफ शेख, समाधान पाथरवट, रणजित पाटील, संजय सोनार, किशोर पाटील आदी उपस्थित होते. कुणा मिळकतधारकास काही अडचण आल्यास त्यांनी स्थानिक पातळीवरील शहरी व ग्रामीण भागातील कॉंग्रेस पदाधिका-यांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment