गुप्ता यांच्या किडनीबाबत आवश्यक कार्यवाहीचे निर्देश

जळगाव – जळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था बघून सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांच्यासह काही जणांनी मनपा व जिल्हा प्रशासनासह वरिष्ठ पातळीवर निवेदन दिले होते. आपली किडनी विकून आलेल्या रकमेतून जळगाव शहरातील रस्ते तयार करण्याबाबत ते निवेदन होते. ज्या रस्त्यांच्या मुद्द्यावर आमदार सुरेश भोळे आमदारकीची निवडणूक जिंकले त्या रस्त्यांची निवडणूकीच्या पुर्वीपासूनच वाट लागली आहे. आमदार भोळे यांचे भले झाले असले तरी जळगाव शहरातील रस्ते मात्र खड्ड्यात गेले असून सन्माननीय वाहनधारक व सन्माननीय पादचा-यांनी आपल्या जिवाचे हाल करुन घेतले असल्याचे दिपककुमार यांचे म्हणणे आहे.

या सर्व बाबी लक्षात घेत दिपककुमार गुप्ता यांच्यासह काही जणांनी प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनावर सह्या करणा-या सर्व जणांनी आपली किडनी विकून आलेल्या रकमेत जळगाव शहरातील रस्त्यांची निर्मिती करण्याचे म्हटले. मात्र या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होता कामा नये याकडे देखील त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.

या पत्राच्या अनुशंगाने अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्तांच्य्या नावे एक पत्र दिले आहे. गुप्ता यांच्या पत्राच्या अनुशंगाने नियमानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे त्या पत्रात म्हटले आहे. याप्रकरणी काय कार्यवही झाली त्याबाबत अर्जदार गुप्ता यांना कळवण्यात यावे असे देखील पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here