आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 28 सप्टेबर रोजी

On: September 27, 2021 9:29 PM

जळगाव – माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशात 12 ऑक्टोबर पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीसह प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरुन सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहे. 28 सप्टेबर रोजी हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जात आहे.

जळगावचे माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी शासन स्तरावर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. त्या संदर्भात पोलिस अधिक्षक कार्यालय, जळगाव महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी सर्व संबंधितांना सुचना दिल्या आहेत. 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा केला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment