पाचोरा शहरात कडकडीत बंद

On: October 11, 2021 6:36 PM

पाचोरा (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडून ठार करण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने केलेल्या बंदच्या आवाहनाला कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे.

शेतकरी विरोधी तिन काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या तिनशे दिवसांपासुन दिल्लीच्या सिमेवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पंतप्रधान मोदींनी ठेंगा दाखवला आहे. त्यातच रहीमपुर खेरी या गावातील शेतकरी सनदशीर मार्गाने आंदोलन करत असतांना त्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने स्वतःच्या गाडी खाली चिरडले. यात एक पत्रकार देखील शहीद झाला आहे. शहीद शेतकर्‍यांच्या परीवाराला सांत्वन भेट देण्यासाठी गेलेल्या कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. या सर्व घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला पाचोरा शहरातील व्यापा-यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. दिलीप वाघ, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, गटनेते संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भालेराव, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमजद पठाण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावरकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अझर खान, कॉग्रेस चे जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, प्रा. एस. डी. पाटील, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अ‍ॅड. वसीम बागवान, नाना पाटील, भुषण पाटील, शरीफ खाटीक, गणेश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बशिर बागवान, नितीन तावडे, रणजित पाटील, सत्तार पिंजारी, गौरव वाघ, उमेश एरंडे, हेंमत पाटील, अ‍ॅड. अविनाश सुतार, गोपी पाटील, सलिम शाह, खलील देशमुख, वासुदेव महाजन, अशोक मोरे, भोला चौधरी, संजय पाटील, विनोद पाटील, हरुन देशमुख, भगवान मिस्तरी, अरुण पाटील, प्रकाश भोसले, शिवसेनेचे शिवसेना गणेश पाटील, पप्पू राजपुत, प्रवीण ब्राम्हणे, अनिल सांवत, आंनद पगारे, आदी उपस्थित होते. बंद दरम्यान आ. किशोर पाटील, डीवायएसपी काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलिस उप निरीक्षक विकास पाटील आदींनी भेट दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment