अनैसर्गीक कृत्याच्या आरोपप्रकरणी डॉ. शेवाळेंना जामीन

On: October 30, 2021 10:36 AM

अकोला : रुग्णालवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा अकोला येथील डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे यांच्यावर आरोप आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अटकेत असलेल्या डॉ. शेवाळे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायमुर्ती ए. के. शर्मा यांच्या न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर मंजुर केला आहे.

सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशनला याप्रकरणी 14 ऑक्टोबर रोजी पिडीत तरुणाने तक्रार दाखल केली होती. तो वैद्यकीय उपचाराकामी डॉ. शेवाळे यांच्या दवाखान्यात गेला होता. त्यावेळी डॉ. शेवाळे यांनी त्याच्यासोबत अनैसर्गीक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे स्टींग ऑपरेशन दरम्यान व्हिडीओ चित्रण करण्यात आले आहे. सिव्हील लाईन्स पोलिस स्ठानकात याप्रकरणी डॉ. अनंता शेवाळे यांच्याविरुद्ध भा.द.वि. 377 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. शेवाळे यांच्यावतीने अ‍ॅड. दिलदार खान व केशव इगोले यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. होमो सेक्सुलीटीबाबत उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाचे दाखले यावेळी सादर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर डॉ. शेवाळे यांचा जामीन मंजूर करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment