राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता

On: December 25, 2021 10:11 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान काही मंत्र्याच्या हाती नारळ दिला जाणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचे असमाधानकारक कामकाज लक्षात घेता त्यांना मंत्रिमंडळातून कमी केले जाणार असल्याचे वृत्त आहे. अधिवेशनानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंत्र्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा श्रेष्ठींपुढे मांडणार आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. याकामी 28 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment