पाचोरा येथे उद्या कॉंग्रेसचा मेळावा

On: December 28, 2021 12:56 PM

जळगाव : संघटनात्मक बळ वाढवण्यासह आगामी निवडणूकांच्या तयारीचा भाग म्हणून पाचोरा येथे उद्या 29 डिसेंबर रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह विविध सहकारी संस्था या निवडणूकांचे नियोजन आणि नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार यांचा सत्कार या मेळाव्यात होणार आहे.

29 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता शहरातील भडगाव रोडवरील पाटील दैवयोग मंगल कार्यालयात सदर मेळावा होणार आहे. मेळाव्याचे अध्यक्ष कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याच्या तयारीसाठी पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला शहर अध्यक्ष अँड. अमजद पठाण, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अँड. अंबादास गिरी, महीला तालुका अध्यक्षा अँड. मनिषा पवार, जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, जिल्हा उपाध्यक्षा कुसुम पाटील, अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार, अँड. कदीर बागवान, शंकर सोनवणे, शरीफ शेख, प्रदीप चौधरी, कल्पेश येवले, सचिन पाटील, रवी सुरवाडे, संजय सोनार आदींची उपस्थिती होती. या मेळाव्याला सर्वाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अँड. अमजद पठाण यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment