अझीम प्रेमजींविरुद्ध याचिका – वकिलांना तुरुंगवास

On: January 16, 2022 3:28 PM

विप्रो कंपनीचे सुप्रीमो अझीम प्रेमजी यांच्याविरुद्ध एकाच प्रकरणाशी संबंधित अनेक याचिका दाखल करण्याचा प्रकार दोन्ही वकिलांच्या अंगाशी आला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने या दोन वकिलांना दोन महिने तुरुंगवास तसेच दोन हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.

आर्थिक अनियमिततेचा आरोप करत ”इंडिया अवेक फॉर ट्रान्स्परन्सी” या स्वयंसेवी संस्थेच्या आर सुब्रमणियन आणि पी. सदानंद या दोघा वकिलांनी एकाच प्रकरणात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने या संस्थेला मागील वर्षी याच प्रकरणी दहा लाख रुपयांचा दंड सुनावला होता. यावेळी थेट वकिलांना दोषी ठरवले असून तुरुंगवास सुनावला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment