“बेटी बचाव बेटी पटाव” उच्चार झाला चुकून—- विरोधकांना बोलण्याची संधीच आली चालून!!

जागतिक आर्थिक परिषदेत बोलत असतांना टेली प्राँम्पटर मधील बिघाडामुळे पंतप्रधान मोदी विरोधकांच्या निशाण्यावर आले. हा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यानंतर ब्रम्हकुमारींच्या आयोजित एका कार्यक्रमात मोदींकडून चुकीचा उच्चार झाल्याने ते पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

“बेटी बचाव बेटी पढाव” या घोषवाक्याला अनुसरुन पंतप्रधान मोदी बोलत होते. “पढाव” या शब्दाच्या ऐवजी त्यांनी “पटाव” असा शब्द उच्चारला. त्यामुळे या घोषवाक्याचा पूर्ण अर्थच बदलून गेला. हा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. टेली प्राँम्पटरची मदत घेतली असतांना देखील हे कसे झाले? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. आज पुन्हा टेली प्राँम्पटरने गडबड केली काय असा देखील प्रश्न विचारला जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here