अझीम प्रेमजींसह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

On: January 29, 2022 4:34 PM

बंगळुरु : विप्रो कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष असलेले अझीम प्रेमजी, त्यांच्या पत्नी व पी.व्ही. श्रीनिवासन यांच्याविरुद्ध विश्वासघात तसेच भ्रष्टाचाराचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश बंगळुरु येथील एका विशेष न्यायालयाने दिले आहेत.

याप्रकरणी न्यायालयाने नमुद केले आहे की प्रेमजी, त्यांची पत्नी आणि पी. व्ही. श्रीनिवासन यांनी कंपन्यांचे संचालक म्हणून अझीम प्रेमजी ट्रस्टची मालमत्ता हस्तांतरित करत पैशांचा कथितरीत्या दुरुपयोग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. अभिलेख्यात सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे दिसून येते की हे तिघेही सार्वजनिक कर्तव्याचे पालन करत होते व त्यामुळे ते लोकसेवक आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment