पाचोरा शहरातील दुकानाला आग

On: February 2, 2022 12:28 AM

जळगाव : पाचोरा शहरातील नवकार प्लाझा या व्यापारी संकुलातील रेडिमेड कापड दुकानाला आग लागण्याची घटना 31 जानेवारीच्या रात्री घडली. या घटनेत लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून सुदैवाने प्राणहानी टळली आहे.

पाचोरा पोलिस स्टेशनला या घटने प्रकरणी नोंद घेण्यात आली आहे. भुषण पाटील यांचे पूर्वा फॅशन कलेक्शन नावाचे तळ मजल्यावर रेडिमेड कापड दुकान आहे. शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला आग लागल्याचे म्हटले जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment