अल्पवयीन बालकांनादेखील अटकपूर्व जामीनाचा अधिकार

On: February 8, 2022 11:02 AM

औरंगाबाद : जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी दाखल एका गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅड. दिलीप खंडागळे यांनी केरळ उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला आहे. या दाखल्याच्या आधारे विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक होण्याची भीती असल्यास ते अटकपूर्व जामिन अर्ज दाखल करु शकत असल्याचे स्पष्ट केले आहे.

बिडकीन येथील मावशी व आजीला भेटण्यासाठी फिर्यादी गेला असतांना त्याच्यावर अकरा आरोपींनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी अकरा जणांविरुद्ध बिडकीन पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली आहे. या अकरा आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश करण्यात आला होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी या बालकाने अ‍ॅड. खंडागळे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळण्याकामी अर्ज केला. अ‍ॅड. खंडागळे यांनी जे. जे. अ‍ॅक्ट कलम 10 प्रमाणे अटी व शर्थीनुसार न्यायालय जामीन मंजूर करु शकत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्या. ए. ए. कुलकर्णी यांच्याकडून जामीन मंजूर करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment