भुसावळ शहरात तरुणाची हत्या?

On: May 28, 2022 6:05 PM

जळगाव: भुसावळ शहरातील इंदीरा नगर परिसरातील रेल्वे लाईननजीक आज दुपारी एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मयत तरुणाचे अंदाजे वय 35 वर्ष असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.

मयत तरुण हा अद्याप सर्वांच्या दृष्टीने अनोळखी असून त्याची हत्या का व कशासाठी करण्यात आली हे देखील अद्याप उघड झालेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी उप विभागीय अधिकारी गावीत, शहर पोलिस स्टेशनचे पो.नि.पडघन, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू व त्यांचे सहकारी कर्मचारी दाखल झाले. या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीकामी रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment