सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियान वर आधी रेप नंतर मर्डर ; नारायण राणेंचा आरोप

On: August 4, 2020 10:14 PM

मुंबई : सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा हिच्यावर आधी रेप व नंतर तिचा मर्डर करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सुशांत सिंग याची आत्महत्या नसून त्याची हत्या झाली असल्याचा देखील आरोप नारायण राणे यांनी केला आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग यांच्या कथित आत्महत्या प्रकरणाला आता पूर्णपणे राजकीय वळण लागल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी ज्या रितीने सुरू आहे त्यातून कुणाला तरी वाचवण्यात येत असल्याचा देखील खळबळजनक आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहे. गेल्या 50 दिवसात आरोपींचा शोध मुंबई पोलिसांनी का लावला नाही? असा सवाल भाजपचे नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला. सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सलियन ही होती. तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट आपल्याकडे असल्याचे राणे यांनी सांगितले. तिच्या गुप्तांगात जखमा आहे, त्यावरून तिच्यावर आधी रेप व नंतर तिचा खून झाला असल्याचा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment