फडणवीस उपमुख्यमंत्री व्हावे – भाजप केंद्रीय टीमची इच्छा

On: June 30, 2022 6:58 PM

राज्यातील अभूतपूर्व राजकीय सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे गटासोबत भाजप राज्यात नव्या सरकारची स्थापना करत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. मात्र भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रसार माध्यमांना म्हटले आहे की, भाजपच्या केंद्रीय टीमने हे ठरवले की, देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारुन राज्यातील सरकारमधे सहभाग घ्यावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment