मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रियतेच्या पाचव्या क्रमांकावर

uddhav thackeray

मुंबई : देशातील प्रमुख मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रियतेत पाचवा क्रमांक पटकावण्यात यश मिळवले आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्स या संस्थांच्या वतीने एकत्रीतपणे एक सर्व्हे करण्यात आला  होता. त्या सर्व्हेच्या पाहणीतून टॉप पाच नावे पुढे आली आहेत. यात प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव आणि स्थान कायम राहिले आहे. यापुर्वी जानेवारी महिन्यात या संस्थेने सर्व्हे केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढलेली आहे.

द्वितीय क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव आले आहे. तिस-या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगमोहन रेड्डी तर चौध्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आले आहे. पहिल्या सात नावांपैकी सहा मुख्यमंत्र्यांची नावे बिगर भाजपशासित आणि काँग्रेसशासित राज्यातील आहे. नितीशकुमार यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here