देवेंद्र फडणवीस भाजपा-सेना युतीचे मुख्यमंत्री होणार – बावनकुळे

On: August 21, 2022 1:29 PM

अकोला : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत. ते कोठेही जाणार नाहीत,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात फडणवीस भाजपा-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री असतील, असे देखील विधान चंद्रशेकर बावनकुळे यांनी केले आहे. अकोला येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींसोबत बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहून उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर देवेद्र फडणवीस आपला मोर्चा दिल्लीकडे वळवणार का? असे विचारले जात होते. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत असून पुढेही करत राहतील. ते दिल्लीला जाणार नाहीत. सध्या येत असलेल्या बातम्या काल्पनिक आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. आगामी काळात ते भाजपा-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री होतील. आमच्यासारखा कोणताही कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करु शकत नाही. या राज्याला देवेंद्र फडणवीसच पुढे नेऊ शकतात. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे,” असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीवर भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. “या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा तसेच मागणी करण्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस हे जात, धर्माच्या वर आलेले आहेत. ते एक कर्तृत्ववान नेते आहेत. त्यामुळे त्यांचा विचार हा त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारेच झालेला आहे. त्यामुळे मागणी कोणीही करु शकतं,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment