आता जनता तुम्हाला शॉक देईल- चंद्रकांत पाटील यांचा उर्जा मंत्र्यांना इशारा

On: August 12, 2020 7:39 PM

मुंबई : राज्यातील वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक देण्याची सवयच आहे. मात्र जनता देखील लवकरच तुम्हाला शॉक देईल कारण जनता सर्व बघत आहे असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिला आहे.

राज्यातील वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ” वीजबिले वाढलेली नाहीत, तर लोकांचा तसा समज झाल्याचे ऊर्जामंत्री सांगत असल्याची बातमी वाचनात आली. हे जोडून तयार केलेले सरकार नागरिकांप्रती आपली जबाबदारी विसरले असल्याचे देखील चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.

वसई विरार क्षेत्राचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना जे 5.5 लाख रुपयांचे विज बिल आले आहे, ते भरण्यास त्यांनी नकार दिला. विशेष म्हणजे हे बिल त्यांना बंद असलेल्या शाळा, महाविद्यालयाचे आले आहे. आ. हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या मतदारांना आवाहन केले आहे की कुणीही असे चुकीचे वीज बिल भरू नका. ऊर्जामंत्र्याच्या वाचनात हे आले नाही का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला. जनता सर्व काही बघत आहे असा टोला चंदकांत पाटीळ यांनी लगावला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment