पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप

On: December 17, 2022 11:25 AM

जळगाव : पत्नीला पेट्रोल टाकून जाळून खून केल्याप्रकरणी पतीला सत्र जयदीप मोहिते यांनी सोमवारी न्या. जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अशरफ मोईद्दीन तडवी (४५, रा. उजाड कुसुंबा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सन २०१८ मध्ये अशरफ तडवी याने पत्नी छोटीबाई यांना पेट्रोल टाकून जाळले होते. त्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तडवी याच्याविरुद्ध खुनांचा गुन्हा दाखल होता.

हा खटला सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात चालला. सरकारपक्षातर्फे अँड. वैशाली महाजन यांनी सात साक्षीदार तपासले. यात पाच जणांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. शुक्रवारी न्यायालयाने पती अशरफ तडवी याला गुन्ह्यात दोषी ठरवून भादंवि कलम ३०२ खाली जन्मठेपेची व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी काम पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment