आ.भोळे यांच्या आमदार निधीतून कंजरभाट स्मशानभूमीत हायमास्ट लॅंप

On: February 14, 2023 10:46 AM

जळगाव : जळगाव येथील कंजरभाट समाजाच्या स्मशानभुमीत काही दिवसांपुर्वी आ. सुरेश दामु भोळे यांच्या आमदार निधीतून हायमास्ट लॅंपा बसवण्यात आला आहे. यासाठी सामाजीक कार्यकर्ते योगेश बागडे यांच्यासह राहुल नेतलेकर यांनी पाठपुरावा केला होता. आ.भोळे यांनी नारळ फोडून, बटण दाबून या हायमास्ट लॅंपचे उद्घाटन केले.

याप्रसंगी जुनी पंच कमिटीचे सरपंच तथा समाजाचे उपाध्यक्ष बिरजू नेतलेकर, विजय दहियेकर आदींनी आ. भोळे यांचा सत्कार केला. याठिकाणी लवकरच बोरिंग देखील बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन आ. भोळे यांनी याप्रसंगी दिले. या प्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष बिरजू नेतलेकर, कंजरभाट समाजचे सामजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, विजय अभंगे, योगेश बागडे, राहूल नेतलेकर, नितीन तमायचे, प्रकाश दहियेकर, गोपाल बाटुंगे(जॅक), भिकन रायचंदे, राहुल अभंगे, पंकज गागडे, पंकज नेतलेकर, विकी दहियेकर (पठान), निलेश बागडे, (जॉटी) तसेच इलेक्ट्रिशन नितीन बाटुंगे, सुरज नेतले, अंकुश मलके आदी उपस्थित होते. सचिन बाटुंगे (अप्पा), युवाप्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष विकीभाऊ सोनार यांनी याप्रसंगी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय अभंगे यांनी केले तर आभार राहुल नेतलेकर यांनी मानले. याप्रसंगी कंजरभाट समाजबांधव उपस्थित होते. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment