उर्जामंत्री नितीन राऊत यांना अडवले उत्तर प्रदेशात

On: August 20, 2020 2:03 PM

उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्हयातील बांसा या गावी दलीत सरपंच पप्पू राम यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेची दखल अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अनुसुचीत जाती जमाती विभागाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतली.

उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेश दौ-यासाठी रवाना झाले होते. त्यावेळी आझमगड सिमेवर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांनी अडवल्यामुळे डॉ. नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment