चोरीच्या सोळा मोटार सायकलींसह चोरट्यांना अटक

On: August 31, 2023 3:13 PM

जळगाव : चोरीच्या सोळा मोटार सायकलींसह चौघांना अटक करण्यात आली आहे. चोरीच्या मोटार सायकलींची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. एकुण सोळा मोटार सायकली कशा व कुठून चोरी करण्यात आल्या याची पाळेमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खणून काढली आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर वगळता इतर सर्व मोटार सायकली बुलढाणा, अकोला, अहमदनगर या जिल्ह्यांसह काही गुजरात राज्यातील आहेत. या सोळा मोटार सायकली 7 लाख 60 हजार रुपये किमतीच्या आहेत.

सुनिल शामराव भिल (रा. पिंप्री सीम ता.एरंडोल),  खुशाल ऊर्फ भैय्या राजु पाटील (रा. नागदुली ता.एरंडोल),  गोविंदा अभिमन्यु कोळी (रा. नागदुली ता.एरंडोल) आणि हर्षल विनोद राजपुत (रा.मोहाडी ता.पाचोरा) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सपोनि निलेश राजपुत, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चोबे, सफौ अनिल जाधव, हे.कॉ. संदिप सावळे, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी, अनिल देशमुख, प्रितम पाटील, पो.ना. भगवान पाटील, हेमंत पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, गोरख बागुल, उमेश गोसावी, चापोना अशोक पाटील, चापोकॉ मोतीलाल चौधरी, प्रमोद ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment