एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

On: August 26, 2020 7:35 PM

मुंबई : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बाबतची माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात विविध निर्णय झाले. त्यात हा एक निर्णय घेण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment