शिवसेना जळगाव महानगर तर्फे राज्य शासनाचा निषेध

On: January 10, 2024 8:29 PM

जळगाव : विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकाला विरोधात निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना जळगाव महानगरतर्फे काळ्या फिती लाऊन आंदोलन करण्यात आले. निकाला विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून जळगावचे सर्व शिवसैनिक, पदाधिकारी हे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे असल्याचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. 

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, नीता संगोळे, जया तिवारी, शारदा तायडे, श्रध्दा घोष, युवा सेना जिल्हा प्रमुख पियूष गांधी, महानगर प्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, समनवयक महेश ठाकूर, विभाग प्रमुख किरण भावसार, पुनम राजपूत,  ईश्वर राजपूत, शरीफ रंग्रेज, निलेश ठाकरे, शोएब खाटीक, संजय सांगळे, भारत भोईटे, राहुल पारचा, बजरंग सपकाळे, इकबाल शेख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment