महायुती घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनेला भाजपकडून मान्यता

On: February 16, 2024 2:36 PM

मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी ॲड. श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वराज्य सेना ( मराठा राजकीय पक्ष) गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात काम करत आहे.

राष्ट्रीय स्वराज्य सेना मराठा समाजासह शेतकरी व कष्टकरी घटकांच्या प्रश्नावर कार्य करत आहे. महायुतीचा ‘महाविजय 2024’ साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेना कामाला लागली आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, चंद्रशेखर बावनकुळे व प्रसाद लाड आमदार प्रतोद – समन्वयक पक्ष व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दौरे सुरु करण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment