अमळनेर पोलिस स्टेशनमधील तिघा कर्मचा-यांच्या बदल्या

On: March 4, 2024 5:04 PM

जळगाव : अमळनेर पोलिस स्टेशनमधील तिघा कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आपसातील चढाओढ आणि तक्रारी या बदल्यांमागचे कारण म्हटले जात आहे. या तिघा कर्मचा-यांची एका अकस्मात मृत्यूप्रकरणी 26 फेब्रुवारी रोजी सीआयडी चौकशी देखील झाली होती. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या तिघा कर्मचा-यांबाबत तक्रारींची दखल घेत त्यांच्या तातडीने बदल्या केल्या आहेत.

पोलिस हवालदार शरद पाटील, पोलिस नाईक दीपक माळी आणि रवींद्र पाटील अशी  बदल्या झालेल्या तिघा कर्मचा-यांची नावे आहेत. अमळनेर येथील एका जणाच्या मृत्यूनंतर दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाने या तिघा कर्मचा-यांना बोलावले होते. शरद पाटील यांची भडगाव पोलिस स्टेशन, दीपक माळी यांची बोदवड पोलिस स्टेशनला आणि रवींद्र पाटील यांची अडावद पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. अजून काही जणांची देखील बदली होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment