उत्तर प्रदेशातील डबर मर्डरचा झाला उलगडा

On: August 30, 2020 5:13 PM

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर राहणारे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आर.डी.बाजपेयी यांच्या पत्नी व मुलाची काही दिवसांपुर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडाचे गूढ पोलिसांनी उकलण्यात यश मिळवले आहे.लखनऊ शहराच्या पॉश भागातील रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याच्या घरात दुहेरी खून झाल्यामुळे खळबळ माजली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानापासून जवळच ही घटना घडली होती. मुलीनेच आई आणि भावाची हत्या केल्याचे उघड झाले असून घटनेनंतर मुलीने स्वत:च्या हातावर ब्लेडचे वार करून घेतले आहेत. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर बंगल्याच्या परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. हे हत्याकांड करणारी मुलगी अल्पवयीन असून तिने या गुन्हयाची कबुली दिली आहे. मानसिक तणावातून तिने हे कृत्य केल्याची माहिती मिळत असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment