जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी दरम्यान आतापर्यंत सहा फे-या आटोपल्या असून भाजपच्या रक्षा खडसे त्यांचे प्रतिस्पर्धी रा.कॉ.चे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा 70425 मतांनी आघाडीवर आहेत. जळगाव जिल्ह्यात महिला राज येणार असल्याचे या निमीत्ताने म्हटले जात आहे. दरम्यान इव्हीएम मशीनवर रा.का. चे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही वेळ मतमोजणी बंद करण्यात आली.
रावेरच्या सहाव्या फेरीत रा.कॉ.चे श्रीराम पाटील यांना एकुण 20715 मते पडली आहेत. सहाव्या फेरीअखेर त्यांना एकुण 90809 मते पडली आहेत. भाजपाच्या रक्षा निखील खडसे यांना सहाव्या फेरीत 25394 मते पडली आहेत. पाचव्या फेरी अखेर रक्षा खडसे यांना 161334 एवढे मतदान झाले आहे. रावेर मतदार संघाच्या सहाव्या फेरी अखेर एकुण मतदान 303745 एवढी मतमोजणी झाली आहे.