घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तहसील कार्यालयात शुक्रवारी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी अमित रंजन (IAS – केळापूर) यांच्या अध्यक्षतेखाली घाटंजी तालुक्यातील एकूण ४८ ग्रामपंचायतीचे प्रवर्गनिहाय आरक्षण तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी विजय साळवे (घाटंजी) यांच्या हस्ते काढण्यात आले. घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यासाठी तहसील कार्यालयाचे निवडणूक नायब तहसिलदार दिलीप राठोड, घाटंजीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या वंदना नानोटे हजर होते.
घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, नागरिक या आरक्षण कार्यक्रमप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी घाटंजी तहसील कार्यालयात सरपंच पदाच्या महिला आरक्षणासह सोडत पद्धतीने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
अनुसूचित जाती महिला (SC LADIES) – पंगडी, भांबोरा, अनुसूचित जाती (SC) – आमडी, हिवरधरा, अनुसूचित जमाती महिला (ST LADIES) – कवठा खुर्द, कुर्ली, पार्डी नस्करी, शिरोली, अनुसूचित जमाती (ST) – सगदा, बेलोरा, मारेगांव, ठाणेगांव, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC LADIES) – पाटापांगरा, सायतखर्डा, पिंपरी, मानोली, इंझाळा, जरुर, तरोडा, नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – ससाणी, सावरगांव, मांडवा, खापरी, कुंभारी, कु-हाड, सर्व साधारण महिला (OPEN) – चोरंबा, मांजरी, येरंडगांव, मुरली, पांढुर्णा बुजुर्ग, चांदापूर, अंजी नृसिंह, वासरी, राजापेठ, पांढुर्णा खुर्द, कोची, आंबेझरी सर्व साधारण (OPEN) – डांगरगांव, तिवसाळा, साखरा खुर्द, सावंगी संगम, देवधरी, दहेगांव, किन्ही, मोवाडा, शिवणी, जरंग, वघारा टाकळी आदीं ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.









