महाराजस्व अभियानांतर्गत सावळी (सदोबा) येथे समाधान शिबिर

On: July 19, 2025 7:42 PM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आर्णी तालुक्यातील सावळी (सदोबा) येथे दिनांक 24 जुलै 2025 गुरुवार रोजी 11 वाजता साई मंगल कार्यालय सावळी (सदोबा) येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या समाधान शिबिरात शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महावितरण विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, महिला व बालकल्याण विभाग, निम्न पैनगंगा प्रकल्प विभाग, कृषी विभाग, बचत गट या विभागाचे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आणि संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहून आपआपल्या विभागाशी संबंधित तक्रारी व अडचणी ऐकून त्या सोडवण्याच्या प्रयत्न करतील.

घरकुल योजना, नवीन विहिरी मंजूर, आधार कार्ड अपडेट, राशन कार्ड, श्रावणबाळ बाळ व संजय गांधी निराधार योजनेतील व लेख लाडकी योजना, लाडकी बहीण योजना यातील अनेक समस्या व अडचणी आणि लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी या समाधान शिबिरात प्रयत्न केले जातील. सावळी सर्कल मधील ज्या ज्या गावातील तेथील लोकांच्या अडचणी असतील त्यांनी लेखी स्वरूपात तहसील कार्यालय, आर्णी किंवा गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) यांच्याकडे कळवल्यास या समाधान शिबिराच्या दिवशी तिथेच त्याचे उत्तर देण्यात येईल.

या समाधान शिबिराला आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम, तहसीलदार आर्णी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर्णी, जिल्हा परिषद व पंचायत समिती, पाणी पुरवठा विभाग आणि विज वितरण कंपनी महावितरणचे उप अभियंता, अभियंता व अधिकारी वर्ग तसेच इतर सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आर्णी तहसीलचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment