कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्याचे गाळे —- पोलिस कारवाईत दिसली पाळे, नष्ट होतील का मुळे 

On: August 14, 2025 7:37 PM

जळगाव : कॅफेच्या नावाखाली कॅफेमध्ये महाविद्यालयीन प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करण्याचे प्रकार जळगाव शहरात कित्येक ठिकाणी सुरु आहेत. कॅफे चालकच या महाविद्यालयीन प्रेमी युगलांना तशी सोय उपलब्ध करून देतात. नुकत्याच जामनेर येथे घडलेल्या घटनेवरून हा प्रकार उघडकीस आला. या पार्श्वभूमीवर रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या पथकाने त्यांच्या हद्दीतील एका कॅफेवर कारवाई केली आहे. तरुण-तरुणींना अश्लील चाळे करताना या ठिकाणी पकडण्यात आले. या कॅफे तालुका विरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला रीतसर कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी आढळलेल्या प्रेमी युगलांसह त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली. अशा प्रकारच्या कॅफेची पाळेमुळे खरोखर नष्ट होतील का? हा कळीचा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व त्यांच्या पथकाने आज 14 ऑगस्ट रोजी गोल्ड जिम परिसरातील परिसरातील कॉलेज कट्टा या नावाने सुरु असलेल्या कॅफेवर अचानक छापा घातला असता त्या ठिकाणी गैरप्रकार आढळून आला. या ठिकाणी तरुण मुले मुली अश्लील गैरप्रकार करताना पोलीस पथकाला आढळले. 

छाप्यादरम्यान या कॅफेमध्ये ३ X ३ लांबी रुंदीचे प्लाऊडचे व सुमारे ५ फुट उंचीचे विवीध कप्पे व त्यास बाहेरच्या बाजुने पडदे बसवलेले आढळून आले. आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोफे ठेवलेले दिसुन आले. छाप्या दरम्यान कॉलेज कट्टा या कॅफे मध्ये एकूण 07 जोडपे (मुले व मुली) तेथे अश्लिल चाळे करताना मिळून आले. त्यांना बाहेर काढून त्यांचेकडून माहिती घेत त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. सर्व तरुण-तरुणींच्या पालकांना यावेळी समज देण्यात आली.

कॉलेज कट्टा नावाच्या या कॉफी शॉप मध्ये चहा व कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य नव्हते. कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुरनं 287/2025 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (अ) (क) अन्वये सरकारतर्फे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील पीएसआय सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, मपोशि स्वाती पाटील आदीनी सहभाग घेतला. या गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment