भाजपाचे माजी नेते जसवंत सिंह यांचे निधन

On: September 27, 2020 10:36 AM

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमात गेले होते. जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुख: व्यक्त केले आहे.

भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी जसवंत सिंह होते. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीरित्या पुर्ण केली होती. सन १९९६ ते २००४ या कालावधीत ते संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्राालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्री होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment