शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात

On: June 20, 2020 9:45 AM

जळगाव :  शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोनाचे संकट लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव शिवसेनेच्या तमाम शिसैनिकांनी शिवसेनेचा वर्धापन दिन सोशल मिडियाद्वारे जल्लोषात साजरा केला.

शिवतिर्थ मैदानावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास वंदन करून शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस यावेळी माल्यार्पण करण्यात आले.  यासह ५४० वृक्षांच्य रोपांचे वितरण देखील यावेळी करण्यात आले. सोशल डिस्टंसचे पालन करत तमाम शिवसैनिकांनी ५४० आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांना  वृक्षांच्या रोपांचे वितरण यावेळी करण्यात आले. ज्याप्रमाणे शिवसेनेच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले त्याप्रमाणे शिवसैनिकांनी या रोपांचे वटवृक्षात रुपांतर करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या प्रसंगी माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, युवासेना विस्तारक किशोर भोसले, नगरसेवक गणेश सोनवणे, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, हेमराज चव्हाण,हितेश शहा,विलास भदाणे, नितीन राजपूत, राहूल नेतलेकर, सोहम विसपुते, विपीन पवार, भैया वाघ, जितू गवळी, राजेश शिंपी, दिलीप बारी, ललित कोतवाल, सागर कुटुंबळे, चंद्रकांत कानडे, राहुल झाल्टे, अजय काशीद, गणेश गारगुंडे, बजरंग सपकाळे, सनी सोनार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment