शिरपूरचे उद्योगपती तपनभाई पटेल यांचा अपघाती मृत्यू

On: September 30, 2020 11:23 AM

शिरपुर : शिरपूर येथील उद्योगपती तथा न.पा.चे बांधकाम समिती सभापती तपनभाई मुकेशभाई पटेल यांचा आज मध्यरात्री अपघाती मृत्यू झाला. तपनभाई हे सावळदे निम्स कॅम्पसमधून घराकडे येत असतांना महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळ दुभाजकाला त्यांचे वाहन धडकले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात त्यांच्या वाहनाच्या पुढील भागाचा चक्काचूर होवून दोन्ही चाके निखळली.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचा पुतण्या तपनभाई यांच्या वाहनाला हा अपघात आज पहाटे १ वाजेच्या सुमारास झाला. आलेल्या पाहुण्याला सोडून परत येतांना हा अपघात झाला. गाडीचा वेग अती असल्यामुळे गाडी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जावून आदळली. या घटनेची माहिती मिळताच त्यांना नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमधे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment