कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार – भाजप नेत्याला अटक

On: October 4, 2020 7:20 PM

प्रयागराज : हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी सध्या संताप उसळला आहे. दरम्यान प्रयागराजमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली एका भाजप नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

महाविद्यालयात जाणा-या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेप्रकरणी पीडितेनं कर्नलगंज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाअंती भाजप नेत्याला अटक केली आहे.

हाथरस प्रकरणी भाजपची प्रतीमा दुरुस्त करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकार प्रयत्न करत असतांना आता यु.पी. मधे हा नवा प्रकार समोर आला. या प्रकरणी भाजपाचे नेते डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराज येथे पकडून अटक केली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment