ज्वारीची पोती चोरणारे तिघे अटकेत ;फैजपूर पोलिसांची कामगिरी

On: October 20, 2020 6:47 PM

जळगाव : यावल तालुक्यातील चिखली येथील शेतक-याची ज्वारीची पोती चोरुन नेणा-या तिघांना फैजपूर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. स.पो.नि. प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या या कारवाईत तिघा आरोपींकडून सहा हजार पाचशे रुपये किंमतीची १३ पोती ज्वारीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चिखली या गावातील जितेंद्र ब्रिजलाल पाटील, कृष्णा वना बादशाह व नितीन प्रवीण तायडे या तिघा जणांना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.

चिखली येथील सोपान वासुदेव पाटील या बळीराजाच्या शेतातून १६ ऑक्टोबर रोजी ज्वारीची पोती चोरीला गेली होती. या घटने प्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स.पो.नि. प्रकाश वानखडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो.कॉ. गोकुळ तायडे, किरण चाटे, अनिल महाजन, महेश वंजारी, उमेश सानप यांच्या तपास पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. या कामगीरीबद्दल शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment