मंत्री मंडळात कोणताही बदल होणार नाही – पवार

On: October 23, 2020 6:30 PM

मुंबई : भाजपाचे माजी नेते एकनाथराव खडसे यांनी आज रितसर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी रा.कॉ.चे बडे नेते उपस्थित होते.

दरम्यान मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याबाबत चर्चा देखील सुरु होती. मात्र या सर्व चर्चांना शरद पवार यांनी लगाम लावला आहे.
मंत्रीमंडळात कोणताही फेरबदल होणार असल्याचा मोठा खुलासा यावेळी रा.कॉ. सुप्रिमो शरद पवार यांनी केला. एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आले असले तरी त्यांना अजून कुठलेही पद दिलेले नाही. पक्ष प्रवेशाचे वेळी स्वत: एकनाथराव खडसे यांनी पदाची अपेक्षा नसल्याचे म्हटले आहे.

खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर देखील मंत्रिमंडळात कुठलाही बदल होणार नसून सर्वजण जैसे थे राहतील. एकनाथराव खडसे रा.कॉ.त आल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला मोठा फायदा होईल. एकनाथराव खडसे हे त्यांनी दिलेला शब्द खरा केल्याशिवाय राहणार नाहीत असे पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे आता काहीही काळजी नसावी असे देखील शरद पवार पुढे बोलतांना म्हणाले. एकनाथराव खडसे यांनी जाहीरपणे शब्द दिला असल्याचे शरद पवार यांनी सांगत त्यांचे कौतुक करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment