लग्नाच्या बेडीएवजी पडली पोलीसांची बेडी

On: June 23, 2020 6:51 PM

पुणे : मोक्काच्या गुन्हयात पाच महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस त्याच्या लग्नातच अटक करण्यात आली आहे. पौड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे लग्नाच्या बेडीत अडकणाया आरोपीस जेलमधे जाण्याची वेळ आली.

या बाबत वृत्त असे की प्राणघातक हल्ल्यासह मोक्यातील आरोपी अक्षय रोहीदास पडळघरे हा गत पाच महिन्यापासून फरार होता. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच मिळालेल्या माहितीनुसार त्याला त्याच्याच लग्नातून अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरिक्षक अनिल लवटे व त्यांच्या सहका-यांनी ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment