जळगाव : गुरांना चारापाणी देण्यासाठी असलेल्या गोठ्यात शेतकऱ्याने आज सकाळी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंमत अजबसिंग पाटील (47) असे आत्महत्या करणा-या शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी गुरांना चारापाणी देण्यासाठी गोठ्यात गेल्यानंतर तेथेच हिंमत पाटील या शेतक-याने गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी नऊ वाजता हा प्रकार उघडकीस आला.
आत्महत्या करणा-या हिंमत पाटील यांच्या पश्चात आई – वडिल, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या आत्महत्याचे नेमके कारण समजले नाही. एरंडोल पोलिस स्टेशनला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.






