रेणू शर्मां रिव्हर्स मोडमधे – बलात्काराची तक्रार मागे

On: January 22, 2021 8:51 AM

मुंबई : रेणू शर्मा हिने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा जिव जणू काही भांड्यात पडला असल्याचे म्हटले जात आहे. कौटुंबिक कारणामुळे आपण ही तक्रार मागे घेत असल्याचे तिने म्हटले आहे. तसे तिने लिखित स्वरुपात पोलिसांना दिले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपामुळे राज्यात खळबळ माजली होती. मात्र असे असले तरी धनंजय मुंडे यांनी प्रामाणीकपणे रेणू शर्मा हिच्या बहिणीसोबत असलेले संबंध कबुल केले होते. त्यात त्यांनी कुठलीही लपवालपवी केली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाची तिव्रता बरीच कमी झाली होती असे देखील म्हटले जात आहे. तरी देखील विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यामुळे मुंडे यांना दिलासा मिळाला असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment