माजी आमदार आबाजी नाना पाटील अनंतात विलीन

On: February 10, 2021 6:19 PM

जळगाव : शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे जामनेरचे माजी आमदार आबाजी नाना पाटील आज दुपारी अनंतात विलीन झाले. मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 94 वर्षाचे माजी आमदार आबाजी पाटील हे मुळचे जामनेर तालुक्यातील शहापुर येथील रहिवासी होते. शैक्षणीक क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा होता.

सन 1962 मधे आबाजी पाटील प्रथमच आमदार म्हणून निवडून आले होते. सलग दोन टर्म अर्थात दहा वर्ष ते आमदार राहिले होते. जळगावच्या राजकारणात आबाजी पाटील यांचा मोठा प्रभाव होता. जळगाव जिल्हा लोकल बोर्डाचे ते सदस्य होते. स्वा. सै. राजमल लखीचंद जैन यांच्यासमवेत आबाजी पाटील यांनी स्वातंत्र्य मिळवण्याकामी काम केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment