अशोकदादा चौधरी यांचा लग्नाचा वाढदिवस उत्साहात

On: February 21, 2021 9:26 PM

जामनेर : जामनेर येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. विकास चौधरी आणि प्रसन्न चौधरी यांचे पिताश्री अशोकदादा चौधरी यांच्या लग्नाचा आज 38 वा वाढदिवस आहे. जामनेर येथील हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले अशोकदादा चौधरी यांच्या लग्नाचा वाढदिवस घरगुती वातावरणात मात्र जल्लोषात साजरा करण्यात आला. अशोकदादा चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन त्यांचे लाडके सुपुत्र अ‍ॅड. विकास चौधरी यांनी केले होते. मात्र कोरोना विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेत अशोकदादा चौधरी यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस घरगुती वातावरणातच साजरा करण्याचे ठरवले. त्याला त्यांच्या दोघा चिरंजीवांनी सहमती दर्शवली.

अशोकदादा चौधरी यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी बोलतांना म्हटले की सहचारीणी शोभाताई यांच्यासोबत जिवनातील 38 वर्षाचा कालखंड कसा लोटला हे लक्षातच आले नाही. संसाराचा रहाटगाडा ओढण्याकामी शोभाताई यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा असल्याचे अशोकदादा चौधरी यांनी यावेळी आवर्जून सांगीतले. मुलांचे शिक्षण व पालणपोषण करतांना होणारी परवड हसतमुखाने झेलण्याचे कसब शोभाताई यांनी दाखवून दिल्याची भावना यावेळी अशोकदादा चौधरी यांनी व्यक्त केली. अशोकदादा चौधरी यांची विकास व प्रसन्न ही दोन्ही मुले, सुना व नातू यांनी उत्साहात घरगुती वातावरणात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment