कोलकाता : खासदार अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे असून त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी आहेत. सीबीआयने रुजिरा बॅनर्जी यांची जवळपास दिड ते दोन तास चौकशी केली असून त्यांच्याकडून बॅंकॉकमधील व्यवहाराबाबत तपशील मागीतल्याचे समजते.
रुजिरा बॅनर्जी यांच्या लंडन व बॅंकॉक येथील खात्यावर सीबीआयची नजर असून या चौकशीतून मिळालेली माहिती सीबीया पडताळून बघणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी रुजिरा यांचे विदेशात बॅंक खाते नसल्याचे म्हटले आहे. रुजिरा यांची बहिण मेनका गंभीर यांच्याकडे देखील सीबीआयने रुजिरा यांच्या खात्याबद्दल चौकशी केली असल्याचे म्हटले जात आहे.








