भाजप नेत्यानेच घेतला स्टेडीयमच्या नामांतराला आक्षेप

On: February 26, 2021 5:24 PM

नवी दिल्ली : जगात प्रसिद्ध असलेले अहमदाबाद येथील सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम (मोटेरा स्टेडियम)चे नामांतर करण्यात आले आहे. आता या स्टेडीयमला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. या नामांतरावरुन विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली आहे. आता तर भाजप नेत्यानेच या नामांतराबद्दल गुजरात सरकारला घरचा आहेर दिला आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. गुजरातचे जावई या नात्याने कित्येक जणांनी आपल्याला विचारणा केल्याचे त्यांनी ट्विटमधे म्हटले आहे. गुजरात सरकारने आपली चुक दुरुस्त करुन नरेंद्र मोदी यांचे नाव मागे घेण्यासह नामांतरापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली नसल्याचे देखील जाहीर करावे अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment