संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर

On: March 4, 2021 5:50 PM

पुजा चव्हाण प्रकरणी गदारोळ माजल्यानंतर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा कुठे अडकला आहे? अशी टीका देखील करण्यात आली होती. आज राज्यपाल कोश्यारी यांनी संजय राठोड यांचा राजीनामा मंजुर केला आहे.

28 फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे रवाना केला होता. अखेर आज राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजुर केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment