प्राध्यापिकेला पाठवला अश्लिल व्हिडीओ – प्राध्यापकास पाच वर्ष कारावास

On: March 5, 2021 3:11 PM

बीड : सोबत काम करणा-या प्राध्यापिकेस अश्लिल चित्रफित असलेल्या व्हिडीओची लिंक पाठवल्यामुळे सदर प्राध्यापकास पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. सन 2017 मधे बिड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी विशेष सत्र न्या. डी.एम.खडसे यांनी हा निकाल दिला आहे. सश्रम कारावासासह आरोपी प्राध्यापकास आठ हजार रुपयांचा दंड देखील सुनावण्यात आला आहे.

गजानन नरहरी करपे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या प्राध्यापकाचे नाव असून आज त्याचे वय 41 वर्ष आहे. सदर प्राध्यापकाने शैक्षणीक संस्थेत नोकरीला असतांना प्राध्यापिकेला अश्लिल व्हिडीओ लिंक शेयर केली होती. विशाखा समितीच्या अध्यक्षपदी असलेली तक्रारदार पीडित प्राध्यापिकेने हा प्रकार महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. या तक्रारीवरुन त्याला निलंबीत करण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment